दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफीज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. या तिघांचीही नावं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल कायदा परिषदेत आहे. 

Updated: May 24, 2015, 04:56 PM IST
दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी title=

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, मुंबई हल्ल्याचा मास्टरमांईड हाफीज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. या तिघांचीही नावं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) अल कायदा परिषदेत आहे. 

सध्या ते पाकिस्तानात वास्तव्यास असल्या कारणानं त्यांची संपत्ती जप्त करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. 
भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य देश असल्यानं भारतानं ही मागणी केली आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारत वेळोवेळी पाकिस्तानला देत आला आहे. 

मात्र प्रत्येक वेळी पाकिस्ताननं हे भारताचे दावे फेटाळले आहेत. हाफीज पाकिस्तानातच आहे. तर लख्वीला गेल्या महिन्यात रावळपिंडी तुरुंगातून सोडण्यात आलं आहे, त्यामुळं तोही पाकिस्तानातच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.