व्हिडिओ : वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात बेदम मारहाण

एका मोबाईल दुकानात एका वृद्ध जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय... यावेळी, इथं उपस्थित असणारे लोक मात्र केवळ तमाशा पाहत राहिले. दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाणीची घटना कैद झालीय. 

Updated: Dec 11, 2015, 02:57 PM IST
व्हिडिओ : वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात बेदम मारहाण title=

चंदीगड : एका मोबाईल दुकानात एका वृद्ध जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय... यावेळी, इथं उपस्थित असणारे लोक मात्र केवळ तमाशा पाहत राहिले. दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाणीची घटना कैद झालीय. 

चंदीगडच्या सेक्टर १८ मध्ये ही घटना घडलीय. हे वृद्ध जोडपं एक मोबाईल दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मारहाण करणारा राजीव ऊर्फ जिब्बी हा तरुण त्यांच्याच भागात राहतो.

या मारहाणीत वृद्धाचा हाथ फ्रॅक्चर झालाय. तर त्यांची पत्नी संतोष कुमारी हिचा एक दातही पडलाय. या घटनेनंतर मात्र हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. 

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आला आणि शिव्या देऊ लागला. वृद्ध जोडप्यानं त्याचा विरोध केला तर त्यानं मारहाण सुरू केली. पोलिसांनी या घटनेची तक्रार नोंदवलीय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.