नवी दिल्ली : आरोग्याला घातक ठरल्याने नेस्लेच्या मॅगीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र, चाचणीतनंतर मॅगीवर बंदी उठविण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज न्यायलयाने नेस्ले कंपनी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.
मॅगीवरील बंदी उठविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली. न्यायालयाने नेस्ले कंपनीला नोटीस बजवताना महाराष्ट्र सरकारलाही नोटीस पाठवली. या नोटीशी द्वारे ५ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय उत्तर देते याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.