उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत दोन्ही ठिकाणी पराभूत

 उत्तराखंडमध्ये भाजपच्या लाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.. या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांनाही पराभवचा सामना करावा लागला असून स्वत: काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री हरिश रावत यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजप उमदेवाराने रावत यांचा तब्बल नऊ हजार मतांनी दणदणीत पराभव केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2017, 12:56 PM IST
 उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत दोन्ही ठिकाणी पराभूत  title=

देहराडून :  उत्तराखंडमध्ये भाजपच्या लाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.. या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गजांनाही पराभवचा सामना करावा लागला असून स्वत: काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री हरिश रावत यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजप उमदेवाराने रावत यांचा तब्बल नऊ हजार मतांनी दणदणीत पराभव केला आहे.

हरिश रावत हे हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून उभे होते. त्यांच्या विरोधात भाजपने यतीस्व रानंद यांना उमेदवारी दिली होती. रानंद यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतल्याने रावत यांचा पराभव होणार असा अंदाज वर्तविला जात होता. मतमोजणीच्या शेवटच्या फेरी अखेर हा अंदाज खरा ठरला आणि रावत यांचा सुमारे ९ हजार मतांनी पराभव झाला. रानंद यांना ४० हजार ७३८ तर रावत यांना ३१ हजार ५२४ मते मिळाली. रावत यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते, त्याचा त्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान उत्तराखंडमध्ये भाजप ५० तर काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर होती.
 
तर हरीष रावत यांचा किच्छा मतदार संघातूनही पराभूत झाले आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या राजेश शुक्ला यांनी ९२ मतांनी पराभव  झाला आहे.