मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?

उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...

Updated: Mar 11, 2017, 01:18 PM IST
मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात? title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...

हाती आलेल्या मतमोजणीच्या आकड्यांनुसार, बहुजन समाज पार्टी मागे पडल्याचं दिसतंय. बसपाचा हा पराभव मायावतींच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. पाच वर्ष सत्तेच्या खूर्चीपासून दूर राहिल्यानंतरही या निवडणुकीत मायावतींनी कुणासोबत युती करणं टाळलं होतं. 

राजकीय विश्लेषकांच्या मते, या पराभवानंतर बसपातर्ले कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याचा धोका आहे. आर के चौधरी, स्वामी प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक सहीत अनेक नेत्यांनी या अगोदरच पक्षाला रामराम ठोकलाय. यानंतर विरोधी पक्षांना मायावतींना आणि सपाला आपल्या निशाण्यावर घेणं सहज शक्य होणार आहे.

दलित मतदार टिकवता आला नाही

मायावती यांनी दलित आणि मुस्लिमांवर विश्वास ठेवला. यूपीमध्ये ४० टक्के दलित मतदार आहेत. परंतु २०१४ मध्ये भाजपने दलित मतदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले. त्यामुळे दलितांकडे पर्याय म्हणून भाजप पक्षाची भर पडली.

मुस्लिम प्रेमामुळे इतर समाज नाराज

मायावती यांनी ९७ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले. त्यामुळे दलित आणि सवर्ण मते बसपपासून दूर गेली. मायावती यांनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्तार अन्सारी यांना पार्टीमध्ये घेतले. परंतु बेनी प्रसाद वर्मा यांना घेतले नाही. याचा फटका बसला. 

बहुजन समाज पार्टी 1984 साली अस्तित्वात आली होती. परंतु, सत्तेत येण्यासाठी या पक्षाला 11 वर्ष लागली. पहिल्यांदा या पक्षानं मुलायम सिंह यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्ता मिळवली... त्यानंतर 1995 मध्ये मुलायम सिंह यांच्या पक्षाची सत्ता उलथवून टाकत मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर बसपाचं राजकारण मायावतींच्या आसपास फिरत राहिलं.