उत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय. 

Updated: Mar 10, 2017, 01:23 PM IST
उत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय. 

सुरूवातीला सपा आणि काँग्रेसला कौल देणारा सट्टा बाजार आता मात्र भाजपच्या बाजुनं झुकला. सट्टेबाजारात क्रिकेटच्या विश्वचषकानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल दहा हजार कोटी रूपयांची उलाढाल उत्तर प्रदेशच्या निकालांवर होत आहे.  

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगुळुरू आणि कोलकात्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आलाय. सर्वात मोठा पक्ष म्हणजू भाजपवर एक रूपया, तर सपा आणि काँग्रेस आघाडीवर दीड रुपयाचा दर देण्यात आलाय. तर बसपाला तीन रुपयांचा दर आहे.

बीजेपी -
२०० हून अधिक जागा - २.५ रुपये
१८०-२०० जागा - १.५  रुपये
१६०-१८० जागा - १ रुपये
१६० हून कमी जागा -  २.५ रुपये

सपा+काँग्रेस -
२००हून अधिक जागा - ३ रुपये
१७०-२०० जागा - १.५ रुपये
१५०-१७० जागा - १ रुपये
१५०हून कमी जागा -  २.५ रुपये

बसपा
२००हून अधिक जागा - ८ रुपये
१५०-२०० जागा- ५ रुपये
१००-१५० जागा - २ रुपये
७०-१०० जागा - १ रुपये
५०-७० जागा - ५० पैसे
५०हून कमी जागा - ४ रुपये