बंगळुरू : 1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अधिकाऱ्यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बंद झालेल्या नोटांच्या बदल्यात दोन हजार आणि शंभरच्या नोटा दिल्याचा आरोप आहे.
सदानंद नायक आणि ए.के. कविन अशी अटक झालेल्या या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं या दोघांना चार दिवसांच्या सीबीआय कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.
या दोघांबरोबरच आरबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी हे पैसे काही लोकांना दिले. या सगळ्यांचा सीबीआय शोध घेत आहे. याआधीही सीबीआयनं वेगळ्या प्रकरणामध्ये आरबीआयच्या अधिकाऱ्याला अटक केली होती. या अधिकाऱ्यानं स्टेट बँक ऑफ मैसूरच्या अधिकाऱ्यावर दबाव आणून सहा लाख रुपयांच्या नोटा बदली केल्याचा आरोप आहे.