भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक

उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे.  

Updated: Apr 25, 2015, 04:09 PM IST
भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक title=

काठमांडू: उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे. पहिला झटका सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी जाणवला, त्यानंतर दुसरा झटका १२ वाजून १९ मिनिटांनी बसला. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता ५.० रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हवामान खात्याने सूचना दिली आहे की, घरांमध्ये जाऊ नये, भूकंपाचे झटके पुन्हा येण्याची शक्यता आहे. 

नेपाळमधील परिस्थिती बिकट असल्याची माहिती आहे. अनेक घरे, इमारती कोसळल्या असल्याचीही माहिती समोर येत आहे. जीवितहानीही झाल्याशी शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीची माहिती घेण्यासाठी दुपारी तीन वाजता तात्काळ बैठक बोलवली आहे. एनडीआरएफच्या टीमला अलर्ट राहण्यास सांगितले आहे. नेपाळमधील काठमांडू एअरपोर्टची सर्व उड्डानं रद्द करण्यात आली आहेत. 

बिहार आणि पश्चिम बंगालमधील भूकंपाचे झटके सर्वात तीव्र होते. राजस्थानमधील झुंझुनू, अजमेर, सीकर आणि बुंदी येथे भूकंपाचे झटके जाणवले. उत्तर प्रदेशात राजधानी लखनऊसह अनेक भागात भूकंपाचे झटके जाणवले. हरियाणा आणि पंजाबमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.