जाणून घ्या: भूकंप आल्यास काय करायचं?

नवी दिल्लीसह उत्तर भारत, विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळमधील कांठमांडूपासून ८० किलोमीटर दूरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दरम्यान, पुन्हा भूकंप येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.  

Bollywood Life | Updated: Apr 25, 2015, 02:13 PM IST
जाणून घ्या: भूकंप आल्यास काय करायचं? title=

मुंबई: नवी दिल्लीसह उत्तर भारत, विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळमधील कांठमांडूपासून ८० किलोमीटर दूरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दरम्यान, पुन्हा भूकंप येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.  

नाशिकमधील पर्यटक सुखरूप

भारतातील अनेक पर्यटक नेपाळमध्ये असण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. नाशिकमधून नेपाळला गेलेले जवळपास ८० पर्यटक सुखरुप असल्याची माहिती मिळतेय.
 
दरम्यान जर भूकंप आला तर काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या...

१. जर आपण इमारतीच्या आत असाल - तर एखाद्या मजबूत लाकडी किंवा लोखंडी टेबलखाली जावं. पलंगाचा आसराही घेऊ शकता. शक्यतो काचेच्या वस्तूंपासून दूर राहावं. 
 
२. जर आपण मोकळ्या जागी असाल : इमारती, विजेचे खांब, झाडांपासून लांब राहावं. 

३. जर आपण कार, बससारख्या वाहनांमध्ये असाल : शक्यतोवर वाहनातच थांबावं, वाहन इमारती, विजेचे खांब, झाडांपासून लांब न्यावं. भूकंपाचे धक्के थांबल्यानंतरही वाहनं सावधपणे पुढे न्यावेत. एखादी इमारत किंवा पूल भूकंपाच्या धक्क्यांनंतरही कोसळण्याची शक्यता असते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.