आता भविष्य ठरवायची वेळ आली आहे- मोदी

गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच भविष्याबद्दलही जनतेचं लक्ष वेधलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com, आहमदाबाद
गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच भविष्याबद्दलही जनतेचं लक्ष वेधलं आहे.
गुजरातच्या जनतेला शुभेच्छा देताना नरेंद्र मोदींनी नव्या वर्षात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी इच्छा व्यक्त केली आहे. २०१३ हे वर्ष सर्वांसाठी शुभ असावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या मोदींची नजर आता भूतकाळाकडे न राहाता भविष्यपथाकडे त्यांनी सगळ्यांनाच पाहायला सांगितलं आहे.
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर सगळ्यांना शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, की आता आपलं भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे. आता फक्त काम करायचं आहे.. काम. आताच आपण आपलं भविष्य घडवू शकतो. ते आपणच ठरवायचं आहे. आणि ते भविष्य आपणच ठरवण्याची वेळ आली आहे.