स्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!

अचानक पेट घेणारे तीन महीन्याचे राहूल नावाचे मूल गुरूवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या आश्चर्यजनक घटनेने डॉक्टरांनादेखील धक्का बसला आहे.

Updated: Aug 12, 2013, 11:38 AM IST

www.24taas.com झी मीडिया, चेन्नई
चेन्नईमध्ये एका अजब बाळाला पाहून डॉक्टरही चक्रावलेत... कारण, हे बाळ पाहता पाहता स्वत: पेट घेतं... यामुळे या बाळाच्या जीवालाही धोका निर्माण झालाय.
आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन राहुलच्या आईनं हॉस्पीटल गाठलं... या बाळाला पाहून डॉक्टरांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. हे बाळ भाजलेल्या अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, ही कोणीही घडवून आणलेली परिस्थिती नव्हती तर हे बाळ स्वत:च पेट घेत असल्याचं तपासणीनंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं. या बाळाला हॉस्पिटलमधील अर्भकांसाठी असणाऱ्या खास ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आलंय. अचानक गरज पडल्यास त्या मुलाच्या बाजूला आग विझवणारे शंकूसारखे एक यंत्र आणि एक पाण्याची बादली ठेवण्यात आली आहे.
गंभीर भाजलेल्या अवस्थेत या तीन महिन्याच्या राहूलला ‘किलपॉक मेडिकल कॉलेज हॉस्पीटल’मध्ये दाखल केले आहे. ते मूलाला ‘स्पॉन्टेनिअस हृयुमन कम्बस्टशन’ नावाचा अतिशय वेगळा आणि विरळ वैद्यकीय व्याधीने पीडित असा हा आजार झालेला आहे.
या आजाराविषयी ऑनलाईन माहीती काढली असता ३०० वर्षात जगभरातून फक्त २०० रूग्ण या आजाराने पीडित असल्याचं हॉस्पिटलचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. आर. नारायण बाबू यांनी सांगितलंय. १९९५ साली लंडनमधील एका ७३ वर्षाच्या वृध्दाबरोबरही अशीच घटना घडली होती. अचानक झोपेत पेट घेऊन त्या वृध्दाचे निधन झालं होतं.
चयापचयनाने तयार होणारे ज्वालाग्रही वायू शरिरात तयार होऊन अचानक बाहेर पडतात आणि पेट घेतात, असे वैद्यकीय नियतकालिकांमध्ये आढळले आहे. डॉक्टरांच्या मते, पेट घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या मुलाला उन्हात जाऊ न देणे, ठराविक प्रकारची कपडे घालणे अशी अनेक पथ्ये पाळावी लागतील. अशा मुलांची आयुष्यभर जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागेल.

चेटूक च्या नावाखाली आईलाचं ठरवलयं दोषी
विल्लुपुरम जिल्ह्यातील नेदिमोलियूर गावातील राजेश्वंरी या शेतमजुराच्या पत्नीला हा मुलगा झाला तेव्हा त्या दाम्पत्यास अत्यानंद झाला होता. परंतु जन्मानंतर नवव्या दिवशी या मुलाने अचानक पेट घेतला तेव्हा तिची पाचावर धारण बसली. राजेश्वतरीने स्वत: मुलाला जाळले, असा आरोप लोकांनी केला. त्यानंतरच्या तीन महिन्यांत पुन्हा तीन वेळा असा मुलखावेगळा प्रकार घडला तेव्हा राजेश्व्रीच चेटूक करते, असे म्हणून गावाने तिला व तिच्या कुटुंबालाही वाळीत टाकले. अखेर विल्लूपूरमच्या जिल्हाधिकार्यांननी भाजल्याच्या गंभीर जखमा झालेल्या राहुलला किलपॉक हॉस्पिटलमध्ये पाठविले. सध्या त्याच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात येत आहे. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगी असून तिच्यामध्ये असा कोणताही दोष नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.