शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!

एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.

Updated: Jun 17, 2016, 09:16 PM IST
शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं! title=

रांची : एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील पांडुबथान सरकारी विद्यालयात इयत्ता तिसरीत अमित कोडा शिकत आहे. त्याला मातृ दिवस काय आहे हेही माहीत नाही. ९ वर्षांचा मुलगा एवढेच जाणतो की, आईला रोज अंडे खाणे गरजेचे आहे.

टीबी सारखा आजार त्याची आई सावित्री हिला झालाय. त्यांची परिस्थिती हालाखीची असते. त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. मात्र, त्याच्या आईला डॉक्टरांनी पौष्टीक जेवण घेण्यास सांगितलेले असते. जेवणात अंडे हवे, असेही सांगितले. मात्र, परिस्थितीमुळे ती अंडे खाऊ शकत नाही. माझ्या आईला अंडे कसे देऊ या विचारात चिमुकला असायचा. त्याने यावर एक युक्ती शोधली.

शालेय पोषण आहात मिळणारे अंडे अमित लपवून घरी नेत असे. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तो असे करीत असे. या चिमुकल्याला एवढे माहित होते की, अंडे खाऊन आईचा आजार बरा व्हावा. आईच जगली नाही तर मला कोण शाळेत पाठवणार, हे तो जाणत होता. ज्यावेळी आई चांगली बरी होईल तेव्हाच मी अंडे खाईन, असे तो सांगतो. मात्र, आईची माया तेवढीच होती. ती अर्ध अंडे त्याला खाण्यास सांगायची, मात्र तो ऐकायचा नाही. आईला संपूर्ण अंडे खाण्यास भाग पाडायचा.

सावित्री यांना चार मुली. अमित एकुलता आहे. सावित्री या टीबीचे औषध घेत होती. मात्र, रोज अंडेही खायला सांगितले होते. मात्र, पोटभर जेवण खायला पैसै नव्हते. त्यामुळे अंडे घेण्यासाठी पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न भेडसावयचा. ही गोष्ट मुलाला सलत होती. तौ बैचेन होता. त्याने आईसाठी शाळेत पोषण आहारात मिळणारे अंडे आणून त्याच्या पद्धतीने तोडगा काढला.