समुद्रामार्गे देशात पुन्हा २६/११चा अतिरेकी हल्ला, १८० बंदरे आणि बेट टार्गेट

नापाक कारवाईबरोबर देशात पुन्हा २६/११सारखा अतिरेकी हल्ला समुद्रामार्गे होण्याची शक्यता आहे. देशातील १८०  छोटी बंदरे आणि बेटे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत.

Updated: Jun 17, 2016, 06:50 PM IST
समुद्रामार्गे देशात पुन्हा २६/११चा अतिरेकी हल्ला, १८० बंदरे आणि बेट टार्गेट title=

नवी दिल्ली : नापाक कारवाईबरोबर देशात पुन्हा २६/११सारखा अतिरेकी हल्ला समुद्रामार्गे होण्याची शक्यता आहे. देशातील १८०  छोटी बंदरे आणि बेटे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत.

अतिरेकी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी लक्षात घेऊन हा हल्ला करण्याची शक्यता आहे. छोट्या बंदरातून प्रवेश करण्याची योजना अतिरेक्यांची असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेनेकडून सांगण्यात आलेय. 

शुक्रवारी गृहमंत्रालयात अंतर्गत सुरक्षेबाबत बैठक पार पडली. यावेळी गुप्तचर यंत्रणेने आपला रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात म्हटले आहे, अतिरेकी समुद्रामार्गे घुसून २६/११सारखा अतिरेकी हल्ला करु शकतात. यासाठी छोट्या बंदरांचा ते वापर करु शकतात.

२००८ मध्ये मुंबई हल्ल्यासाठी अतिरेक्यांनी समुद्रा मार्गाचा वापर केला होता. २६/११सारखा अतिरेकी हल्ला करुन त्यांनी १६४ लोकांचा बळी घेतला तर ३०० पेक्षा जास्त लोक जखमी केलेत. तसाच हल्ला करण्याचा त्यांचा इरादा असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिलेय.

गुजरातमधील चार ठिकाणे, लक्षद्विपमधील सहा ठिकाणे, पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणे आणि अंदमान निकोबारमधील ५ ठिकाणे असून महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील काही ठिकाणांचा यात समावेश आहे. याबाबतचा अहवाल गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला सादर केलाय.