अलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत. 

Updated: Sep 4, 2014, 02:23 PM IST
अलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश title=

नवी दिल्ली : ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत. 

भारतीय उपखंडात दहशतवादी संघटनेची एक नवीन शाखा सुरू करण्यात आली असून यापुढे ‘जिहादी’ अभियान सुरू करणार असल्याची या इस्लामी दहशतवादी संघटनेनं धमकी दिलीय. कृत्रिम सीमांना संपवणार असल्याचंही जवाहिरीनं यात म्हटलंय.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयबीनं देशभरात अलर्ट जाहीर केलाय. सोबतच याच मुद्द्यावर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलीय. गृह मंत्रालयात होणाऱ्या या बैठकीत आयबी, रॉ के यांच्याशिवाय एनएसएचे अधिकारीही सहभागी आहेत. 

अल-कायदाचा प्रमुख अयमन अल-जवाहिरीनं एक व्हिडिओ संदेश जाहीर केलाय. यामध्ये, त्यानं ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इस्लामी दहशतवादी संघटनेनं भारतीय उपखंडात एक नवी शाखा सुरु केल्याचं म्हटलंय. 

एसआईटीई आतंकवादी निगरानी समूह के जिहादी फोरम में पाए गए इस वीडियो में जवाहिरी ने कहा कि नया बल ‘कृत्रिम सीमाओं को खत्म कर देगा’ जिसने इलाके में मुस्लिम आबादी को बांट रखा है ।

अल कायदा ही संघटना केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सक्रिय असलेल्या या संघटनेचं नेतृत्वही इथं दडून बसल्याचं समजलं जातं. पण, जवाहिरीनं, अल-जिहाद लढाईला भारत, म्यानमार आणि बांग्लादेशपर्यंत नेणार असल्याचं या व्हिडिओत म्हटलंय. भारतीय उपखंडात सुरू झालेल्या या नव्या शाखेचं गठण काही आज झालेलं नाही तर दोन वर्षांपूर्वीच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे, असंही जवाहिरीनं या व्हिडिओत म्हटलेलं दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.