जम्मूत जोरदार पाऊस, ८ जणांचा मृत्यू

जम्मू परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पूर आणि भूस्खलनामुळे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला. पावसाचा तडाखा 23 गावांना बसलाय. पुराचा धोका कायम असल्याचे इशारा देण्यातआला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.

Updated: Sep 4, 2014, 01:02 PM IST
जम्मूत जोरदार पाऊस, ८ जणांचा मृत्यू title=

जम्मू : जम्मू परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पूर आणि भूस्खलनामुळे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला. पावसाचा तडाखा 23 गावांना बसलाय. पुराचा धोका कायम असल्याचे इशारा देण्यातआला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे या राज्यातले जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 1 जवानासह सहा लोकांचा मृत्यू झाला. 

पावसामुळे सर्वात जास्त नुकसान पूंछ जिल्हयात झाले आहे. या भागात अनेक रस्ते आणि पुल पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अनेक घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. 

साब्जीया सेक्टरमध्ये बंकर कोसळल्याने बीएसएफच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, काही जवान जखमी झाले आहेत. बेहरामगला भागात पुराच्या पाण्यात एक पोलीस चौकी वाहून गेली आहे.

बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी लष्कर आणि पोलिसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच मंडी भागात आखणी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.