नवी दिल्ली : राज्यातल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टानं दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलीये. यापूर्वीच्या आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. त्याविरोधात फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र हायकोर्टात अद्याप सुनावणी पूर्ण झाली नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेपास नकार दिलाय. तसंच या प्रकरणी हायकोर्टातच पुढली सुनावणी होईल, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर फटका बसल्यानंतर राज्य सरकार सक्रीय झालंय..सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारलेलं नाही..त्यामुळं त्रूटी दूर करून सरकार हायकोर्टात खंबीरपणे बाजू मांडणार असल्याचं, मराठा आरक्षण समितीचे प्रमुखं विनोद तावडेंनी म्हटलंय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.