नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ता अजय माकन यांनी ही माहिती दिली.
सर्दी आणि दम्याचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी तीन दिवसांपूर्वीही असा त्रास झाल्याने त्यांना ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.