नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्रीय परिवहन खात्याच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढलेत.
एका अपघातासंदर्भातल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी अख्खं वर्ष घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं परिवहन खात्याला तब्बल 25 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.
न्यायालयं कामं करत नाही, अशा टीपण्ण्या नेहमीच केल्या जातात. तुम्ही कोणतं काम करताय ? असे खोचक प्रश्न सुप्रीम कोर्टानं यावेळी विचारला. त्याचप्रमाणे येत्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत.