नॅनो नाही... आता येतेय २५ लाखांची ‘सुपर नॅनो’!

गरिबांची नॅनो आत्तापर्यंत 'स्वस्त आणि मस्त मोटार' म्हणून ओळखली जात होती... पण, आता हीच नॅनो एक फॅशन स्टेटमेंट म्हणूनही बाजारात दाखल होणार आहे.

Cars | Updated: Dec 13, 2014, 12:42 PM IST
नॅनो नाही... आता येतेय २५ लाखांची ‘सुपर नॅनो’! title=

मुंबई : गरिबांची नॅनो आत्तापर्यंत 'स्वस्त आणि मस्त मोटार' म्हणून ओळखली जात होती... पण, आता हीच नॅनो एक फॅशन स्टेटमेंट म्हणूनही बाजारात दाखल होणार आहे.

टाटा मोटर्सची 'नॅनो कार' आता नव्या स्वरुपात बाजारात दाखल होणार आहे. परंतु, यावेळेस मात्र कंपनीकडून नसलं तरी 'जे. ए. मोटर स्पोर्ट'कडून ही कार या अगोदरच्या रुपापेक्षा थोडी हटके आणि खूपच दमदार असेल अशी घोषणा केलीय.   

यासाठी, जे. ए मोटर स्पोर्टनं आपण या गाडीच्या इंजिनवर लक्ष केंद्रीत केल्याचं म्हटलंय. १.३ लीटरचं पेट्रोल इंजिन २३० बीएचपी ताकद निर्माण करू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच यामध्ये सहा स्पीड गिअरबॉक्सही असतील. इंजिनच्या दमदार ताकदीमुळे ही छोटीशी कार १८० ते २०० किलोमीटर प्रति तास वेगानं धावू शकेल. 

या गाडीत बोल्ट ऑन रॉल केज आणि उत्तम सस्पेन्शनसोबतच सगळ्याच व्हिल्समध्ये डिस्क ब्रेक असतील. या गाडीच्या बाहेरील बॉडीमध्येही काही बदल करण्यात आलेत. वेगासाठी यामध्ये एअरो डायनामिक डिझाईन बनवण्यात आलंय. यासाठी याचे टायर्सही खास असतील. 

दिसण्यामध्ये ही गाडी एखाद्या रेसिंग गाडीप्रमाणे दिसेल. ही नवीन कार २०१५ पर्यंत तयार होईल तसंच या गाडीची किंमत २५ लाखांच्या घरात असू शकते.

सध्या मात्र ही कार मुंबईत सुरू असलेल्या ऑटो कार परफॉर्मन्स शो, २०१४ मध्ये पाहायला मिळतेय  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.