बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.

Updated: Apr 22, 2015, 07:50 PM IST
बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू title=

पाटना: बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी रस्ते, रेल्वे वाहतूक कोलमडून पडलीये. पूर्णिया, मधेपुराशिवाय कटिहार आणि सहरसामध्येही वादळाचा परिणाम पाहायला मिळालाय.

रात्रीपासून चार जिल्ह्यांमध्ये वारा-वादळामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. 10 हजारहून अधिक घराचं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी वीज पूर्णपणे कोलमडलीय. दरम्यान, बिहार सरकारनं मदतीची घोषणा केलीय. मृतकांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत केली जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.