जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज जम्मू येथे सभा घेण्यासाठी आलेले भाजप नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये सिद्धू यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर होणार आहेत. आज शेवटच्या टप्प्यासाठी प्रचाराला आलेल्या सिद्धू यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये त्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काच्या फुटल्या आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या टप्प्यात विक्रमी मतदान झालेले आहे. मुस्लिम धर्मियांची सर्वाधिक संख्या असलेल्या काश्मीरमध्ये प्रथमच भाजप नेत्याबाबत असे कृत्य घडले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.