स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर

स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

Updated: May 17, 2016, 09:37 PM IST
स्पाईसजेट कंपनीची विमान प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर title=

मुंबई : स्पाईसजेट कंपनीने विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने फक्त ५११ रुपयात विमानाने प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर फक्त भारतात पूर्ती मर्यादीत आहे. विदेशात जर जायचं असेल तर त्यासाठी २१११ रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. स्पाईसजेट या कंपनीला ११ वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे त्यांनी ही ऑफर आणली आहे.

ही ऑफर फक्त ३ दिवसांसाठी असणार आहे. १९ मे पर्यंत तुम्ही तुमचं तिकिट बूक करु शकता. १५ जून २०१६ ते ३० डिसेंबर या दरम्यान तुम्ही भारतात विमान प्रवास करु शकता.  तर १ जून १०२६ ते २० जुलै २०१६ दरम्यान तुम्ही विदेश यात्रेसाठी तिकिट बूक करु शकता.

तुम्ही फक्त डायरेक्ट जाणाऱ्या फ्लाईटसाठीच तिकिट बूक करु शकता. फक्त एका बाजूच्याच प्रवासाकरता तुम्हाला हे डिस्काऊंट दिलं जाईल. तिकिट बूक करण्यासाठी www.spicejet.com वर भेट देवू शकता.