बंगळूर : एका महिलेने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केले, पतीने मोबाईल तपासल्याने रागात तिने वार केले, ही घटना बंगळुरूची आहे.
चंद्रप्रकाश यांच्या तक्रारीनंतर सुनीता यांनीही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी या दोघांनाही बोलावून समज दिली आहे. तसेच पोलिस काही दिवस या दोघांवरही लक्ष ठेवणार आहेत.
सुनीता सिंह आणि चंद्रप्रकाश सिंह असे या जोडप्याचे नाव असून, ते मुळचे बिहारमधील आहेत. ते दोघेही आयटी कंपनीत नोकरीस होते, सुनीताने नुकतीच नोकरी सोडली असून, ती घरी असते.
बंगळूरमधील कईकोनडनाहल्ली भागात ही घटना घडली आहे. या भागात आयटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पतीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली.त्याने पत्नीपासून बचावासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
आपल्या पत्नीला मोबाईलमध्ये व्यस्त राहण्याचे प्रचंड वेड आहे. चार मे रोजी मी रात्री कामावरून घरी परतलो, तेव्हा सुनीताकडे जेवण देण्याची मागणी केली, ती मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये खूप शाब्दिक चकमक झाली.
ती मोबाईलमध्ये एवढी व्यस्त असते तर नेमकं काय करते हे पाहण्यासाठी मी मोबाईल घेतला तेव्हा तिने माझ्या बोटांवर सुरीने वार केल्याचं चंद्रप्रकाश यांनी म्हटलंय.