नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी सोनिया गांधींना दोन दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. त्यामुळे उपचारांनंतर सोनिया संसदेमध्ये येतील.
काळजीचं कारण नसल्याचं काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी स्पष्ट केलंय. रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीशी संबंधित काही तपासण्याही होणार असल्याचं समजतंय.