'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.  

Updated: Aug 3, 2015, 01:17 PM IST
'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी title=

नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय. याशिवाय संसदेतल्या गोंधळावर मोदी निर्विकार का आहेत? असा खडा सवालही सोनियांनी केलाय. 

मोदी हे उत्तम सेल्समन, उत्तम रिपॅकेजिंग करणारे आणि उत्तम हेडलाईन देणारे नेते आहेत असा टोलाही सोनियांनी लगावलाय. सरकार जबाबदारीनं वागण्याऐवजी संख्याबळाचा वापर करत अहंकार दाखवत आहे, असं त्या म्हणाल्या.

आज काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आधी चर्चा मग कारवाई या मोदी सरकारच्या आम्ही निषेध करतो, असं त्यांनी बैठकीत स्पष्ट केलं. ठोस पुराव्यांच्या आधारे काँग्रेस महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत असून सरकार या प्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्यास अनुत्सूक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.