देशासाठी मरू नका, दुश्मनाला मारा - मनोहर पर्रिकर

भारताच्या जवानांनो देशासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान करुन नका तर शत्रूंचा खात्मा करा भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. पर्रिकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

Updated: Dec 14, 2015, 11:24 AM IST

गोवा : भारताच्या जवानांनो देशासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान करुन नका तर शत्रूंचा खात्मा करा भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. पर्रिकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

भारताचे जवान रक्षणसाठी सदैव तत्पर असतात. यावेळी ते आपल्या प्राणांचीही पर्वाही करत नाहीत. मात्र जवानांनो देशासाठी मरु नका, तर शत्रूंचा खात्मा करा, असे पर्रिकर म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीस दहशतवाद्यांविरोधात लढताना मान्यमारच्या सीमेवर अनेक भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर तीन तासांतच बैठक बोलवण्यात आली. या बैठकीदरम्यान या दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आणि तो अमलात आणलाही. या कारवाईबद्दल पूर्ण गुप्तता पाळण्यात आली होती.

पाहा व्हिडियो

 

यावेळी चेन्नईमध्ये पूरग्रस्तांसाठीच्या बचाव अभियानात काम करणाऱ्या सैनिकांचे आणि वायुसेनेचेही त्यांनी कौतुक केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.