स्टील कारखान्यात गॅस गळती, 6 ठार, 25 जखमी

छत्तीसगड राज्यात दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील कारखाण्यात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने अनेक लोक आजारी पडलेत. तर या गॅस गळतीमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 24 जण जखमी झाले असून यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Updated: Jun 14, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगड राज्यात दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील कारखाण्यात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने अनेक
लोक आजारी पडलेत. तर या गॅस गळतीमुळे सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 24 जण जखमी
झाले असून यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली
आहे.

भिलाई कंपनीमध्ये 2 क्रमांकाच्या वॉटर पंपाजवळ गॅस गळती झाली. या अपघातात 2 वरिष्ठ अधिकाऱ्या
सहित 4 जण ठार झालेत. तर 24 अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी 11 जणांची प्रकृती अधित
नाजूक आहे.

ज्या ठिकाणी अधिकारी काम करत होते त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात गॅस हवेत पसरला. या गॅस गळतीमुळे
30 लोक आजारी पडलेत. घटना घडल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावून जखमींना रुग्णालयात
दाखल केले. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान चार अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी 11 लोकांना
अतीदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री रमन सिंग
यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करुन जखमी लोकांवर चांगल्याप्रकारे उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे
आदेश दिलेत. मुख्यमंत्री आज घटनास्थळी भेट देणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.