मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

Updated: Mar 21, 2017, 02:40 PM IST
मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी title=
छाया सौजन्य - महाराष्ट्र शासन, मराठी भाषा संकेतस्थळ

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

खासदार ज्येतिरादित्य सिंधीया यांनी मराठीत बोलताना शिवसेनेच्या मागणीला पाठींबा असल्याचे लोकसभेत सांगितले. सर्व मराठी खासदारांनी जोरदार मागणी करावी, अस लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडं सादर केला आहे. एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. 

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय आणि मराठी भाषेला किती मोठा इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून आहेत. प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. 

अभिजात भाषा दर्जा म्हणजे नेमके काय ?

- ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात
- त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
- त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय. 

अभिजात भाषेचा दर्जा प्रस्ताव

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा अहवाल अभिजात भाषा समितीकडून प्राप्त झाला आहे. अहवालाच्या आधारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव जुलै, 2013 मध्ये केंद्र शासनाच्या संस्कृतिक मंत्रालयास पाठविण्यात आला आहे, असे उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा या संकेतस्थळावर म्हटले आहे.