नवी दिल्ली : दिल्लीत उबेर कंपनीच्या टॅक्सीत (कॅब) बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या ड्रायव्हर शिवकुमार यादव याच्याबाबत नवीन खुलासा समोर आलाय. मानलेल्या काकीने आरोप केलाय की शिवकुमाने माझ्यावरही लैंगिक अत्याचार केलेत. तर टॅक्सी चालक स्वत:ला 'कामदेव' समजतो. तसे त्यांने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेय.
या महिलेने आरोप केला आहे की, शिवकुमारने गावात आला असताना माझ्यावर बलात्कार केला. मात्र, आपली बदनामी होईल, या भीतीने पतीने गप्प राहण्यास सांगितले आणि घराच्या बाहेर पडू नकोस.
मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर टॅक्सीत शिवकुमारने बल्कार केला. त्याला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हजर केले असताना १४ दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्याआधी पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अधिक चौकशी केली असता तसेच त्याला काही प्रश्न विचारले असता शिवकुमारने धक्कादायक उत्तर दिलीत. मी स्मार्ट आहे. त्यामुळे मुली स्वत:हून माझ्याकडे येतात. कोणतीही मुलगी मला नकार देत नाही. मी कामदेव आहे.
पोलिसांनी त्याला आणखी एक प्रश्न केला, त्या दिवशी तू टॅक्सीत मुलीवर रेप केला का? यावर तो हसत उत्तर दिले मी अनेक मुलीबरोबर संबंध ठेवले आहेत. पोलिसांनी अधिक दबाव वाढविल्यानंतर त्यांने सांगितले, मी कामदेव आहे. मी आतापर्यंत ज्या मुलींशी संबंध ठेवले आहेत, ते त्यांच्या मर्जीनुसार. या मुलीसोबतही मी काही जबरदस्ती केलेली नाही.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.