शरद पवार घसरुन पडलेत, उपचारासाठी मुंबईत आणले

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाथरुममध्ये घसरुन पडलेत. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त असून त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

Updated: Dec 3, 2014, 08:27 PM IST
शरद पवार घसरुन पडलेत, उपचारासाठी मुंबईत आणले title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाथरुममध्ये घसरुन पडलेत. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त असून त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

पवार यांच्यावर दिल्लीत प्राथमिक उपचारांनंतर त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. पवार आजारी असल्याचे वृत्त समजतात राष्ट्रवादीमध्ये बैचनी वाढल्याचे वृत्त आहे. मात्र, पवारांना फारसे काही लागलेले नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, काका पवारांना झालेल्या दुखापतीमुळे अजित पवार यांनी देखील आपला दुष्काळी भागाचा दौरा रद्द केला आहे. अजित पवार हे सोलापूरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.