श्रीनगर : श्रीनगरमध्ये पाकिस्तानी झेंडे घेऊन भारतविरोधी काढलेली रॅली मसरत आलमला भोवणार आहे. मसरतला अटक करण्याबाबात केंद्र सरकारने जम्मू काश्मीर सरकारला आदेश दिले आहेत. कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
काश्मिरातील फुटीरतावादी नेता मसरत आलमला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्याला अटक करण्याचे आदेश केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर सरकारला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मसरतनं बुधवारी श्रीनगरमध्ये भारतविरोधी रॅली घेतली.
या रॅलीच्या वेळी चक्क पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले. शिवाय पाकिस्तानच्या बाजूनं आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. अलिकडेच ७ मार्च रोजी जम्मू काश्मीर सरकारनं आलम याची चार वर्षांच्या कारावासानंतर जेलमधून सुटका करण्यात आली होती.
आता त्यानं पुन्हा एकदा भारतविरोधी कारवाया सुरू केल्यानं, त्याला अटक करावी, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काश्मिरी युवकांची माथी भडकवण्याचे उद्योग आलमनं पुन्हा सुरू केल्यानं, त्याला सोडून देण्याच्या मुफ्ती सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका होऊ लागलीय.
दरम्यान, दिल्लीहून परतल्यानंतर बुधवारी फुटीरवादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. गिलानींनी आयोजित केलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.