आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत होणार दाखल

कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचं मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये जलावतरण होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल. 1800 टन वजनाच्या या पाणबुडीच्या बंदर आणि त्यांनतर खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहेत. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरपर्यंत आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत दाखल होईल.

Updated: Jan 12, 2017, 09:31 AM IST
आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत होणार दाखल title=

मुंबई : कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचं मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये जलावतरण होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल. 1800 टन वजनाच्या या पाणबुडीच्या बंदर आणि त्यांनतर खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहेत. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरपर्यंत आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत दाखल होईल.

कलवरी वर्गातील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी गेल्या वर्षाच्या सप्टेंबर पर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र वेळापत्रकाच्या सहा महिने उशीरा म्हणजे पुढील महिन्यात कलवरी नौदल सेवेत दाखल होत आहे. थोडक्यात चार वर्षे आधीच वेळापत्रकाच्या मागे सुरु असलेला पाणबुडी बांधण्याचा कार्यक्रमला आणखी विलंब झालेला बघायला मिळत आहे.