पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस

सकाळपासून मोदींच्या भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात झालीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2017, 11:56 AM IST
पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस title=

सुरत : पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दौ-याचा दुसरा दिवस आहे. सकाळपासून मोदींच्या भरगच्च कार्यक्रमांना सुरुवात झालीय. सुरतमधल्या सुपर स्पेशालिटी किरण हॉस्पिटलचं उदघाटन मोदींनी केलं. सुमारे 400 कोटी रुपये खर्च करुन हे हॉस्पिटल उभारण्यात आलंय. 

अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असं हे हॉस्पिटल आहे. उदघाटनानंतर पंतप्रधानांनी या हॉस्पिटलमधील सोयी सुविधांचा आढावा घेतला. मोदींच्या उपस्थितींमुळे इथल्या डॉक्टरर्स आणि हॉस्पिटल स्टाफमध्येही उत्साह पाहायला मिळत होता. पंतप्रधानांनी या डॉक्टर आणि स्टाफसह फोटोसुद्धा काढला.  तर यावेळी हॉस्पिटलविषयीचा आपला अभिप्रायही मोदींनी पुस्तकात नोंदवला. 

या कार्यक्रमानंतर दिवसभर मोदींचे विविध कार्यक्रम होणार आहे. सुरतमधील हि-याच्या दोन नव्या प्ला्टसचं उदघाटन मोदी करणार आहेत. व्यारा इथल्या सुमुल डेअरी प्लांट, आयस्क्रीम प्लांटचंही उदघाटन मोदी करतील.