नवी दिल्ली : बैलगाडीशर्यती संदर्भातील केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला चांगलाच दणका दिलाय.
बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टानं पुन्हा बंदी घातलीय. केंद्र सरकारनं अधिसूचना काढून महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतल्या जलीकुट्टी या स्पर्धेवरील बंदी उठवली होती.
मात्र, याविरोधात पेटाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं केंद्राला अधिसूचनेला स्थगिती दिलीय. त्यामुळं बैलगाडा शर्यत आणि जलीकुट्टीवरील बंदी कायम ठेवण्यात आलीय.
या निर्णयामुळं राज्यातली बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा कोर्टात फेऱ्यात अडकली आहे. यामुळं मात्र बंदी उठवण्याचं श्रेय घेणाऱ्या भाजपच्या मंत्री आणि नेत्यांना झटका बसलाय.
दरम्यान, यासंदर्भात आगामी अधिवेशनात कायद्यात दुरूस्ती करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार आणि बैलगाडा शर्यतीचे आयोजक शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिलीय.