तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी!

तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत. 

Updated: Jan 12, 2016, 12:39 PM IST
तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी! title=

तूतीकोरिन : तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छोटे छोटे मासे फिन व्हेल प्रकारचे आहेत... परंतु, ते शुद्धीत नसल्याचं जाणवतंय. मानापाडू आणि कलामोझी गावादरम्यान असलेल्या समुद्रतटावर पडलेल्या या माशांपैंकी अनेक माशांना इथं उपस्थित असलेल्या मच्छिमारांनी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा समुद्रात नेऊन टाकलं... परंतु, ते पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत.

बेशुद्ध व्हेल माशांची अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, या माशांची अवस्था अशी का झालीय? याची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मन्नार खाडी स्थिती मरीन पार्क तसंच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केलीय.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ३३ फुट लांबीचा एक मृत व्हेल मासा याच ठिकाणाच्या जवळ नागपट्टिनम जिल्ह्यातील एका गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडला होता.