झाबुआ: लग्नावरून परतत असतांना शस्त्रधारी दरोडेखोरांनी किंमती ऐवज तर लुटलाच, मात्र नवरीलाही ते घेवून गेले. ही धक्कादायक घटना गुजरातच्या गरबरामध्ये घडली आहे.
लग्नाचं वऱ्हाड मध्यप्रदेशमधून परतत असतांनी झाबुआ जिल्ह्यातील मांडला गावात ही घटना घडली. यावेळी १५० वऱ्हाडी तिथं उपस्थित होते. ज्यावेळी किंमती वस्तू दरोडेखोर लुटत होते, त्यावेळी नवरी मुलीनं त्यांना ओळखलं होतं. त्यानंतर नवरी सुमित्रा बेनला दरोडेखोर आपल्यासोबत घेऊन गेले.
याप्रकरणी झाबुआ आणि दाहोदचे पोलीस संयुक्त तपास करत आहेत. या दरोड्यात वापरली गेलेली गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे. मात्र कोणालाही याप्रकरणी अटक झालेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.