फ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.

Updated: Mar 3, 2016, 02:42 PM IST
 फ्रीडम २५१ : रिंगिंग बेल्सचे नोएडामधील कार्यालय बंद title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच कऱणाऱ्या रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नोएडा सेक्टर-63 स्थित आपले कार्यालय बंद केले आहे. कंपनीने १५ दिवसांपूर्वीच या इमारतीत काम कऱण्यास सुरुवात केले होते. बुधावारी कंपनीने हे कार्यालय बंद केले.

 

इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष अशोक चड्डा यांनी सर्व काही ठीक असल्याचे म्हटलेय. आम्ही कुठे पळून जात नाही आहोत. इमारतीतील कार्यालयाच्या भाड्यावरुन काही वाद आहेत ज्यामुळे ते कार्यालय बंद करावे लागलेय. 

नोएडामध्ये नव्या ठिकाणी हे कार्यालय शिफ्ट करत असल्याची माहिती कंपनीने दिलीय. तसेच हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनुसार इमारतीच्या मालकानेही या बातमीला दुजोरा दिलाय. आपणच इमारत खाली कऱण्यास सांगितल्याचे या मालकाने सांगितले. 

फेब्रुवारीमध्ये रिंगिंग बेल्सने सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच केला होता. इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने लोकांची वेबसाईटवर अक्षरश: झुंबड उडाली. मोठ्या प्रमाणात लोकांनी हा स्मार्टफोनची बुकिंग केले. मात्र इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन कसा काय उपलब्ध होऊ शकतो यावरुन अनेक वादही झाले. ज्यानंतर ईडीनेही कंपनीची चौकशी सुरु केली.