'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.

Updated: Jul 2, 2014, 06:37 PM IST
'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत? title=

नागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.

एका आर्थिक वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या सोन्याची क्वालिटी तितकी चांगली नाही आणि याचसाठी या सोन्याल उत्तम प्रतीच्या सोन्यात बदललं जाईल. बँकेनं यासाठी मोठ्या ग्राहकांना आणि आंतरराष्ट्रीय सराफा व्यापाऱ्यांना संपर्क साधणं सुरू केलंय. बँकेनं यासाठी जाहीरातीही दिल्या आहेत.

कशी होणार ही अदला-बदली…

रिझर्व्ह बँक आपल्या नागपूर खजान्यातून सोनं इथल्या बँकांना देईल ज्या लंडनच्या बँकेतून नवं सोनं घेतील. इथल्या बँका जुनं सोनं लंडनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंटमध्ये जमा करतील.

भारताजवळ 20.8 अरब डॉलरचं रिझर्व्ह सोनं आहे. हे सोनं म्हणजे भारताच्या परकीय चलन साठ्याचा एक भाग आहे. भारतानं 1991 मध्ये दिवाळं निघण्यापासून वाचण्यासाठी जे सोनं परदेशांत गहाण टाकलं होतं ते पुन्हा ताब्यात घेतलंय खरं... पण, ते अजूनही तिथल्याच बँकेत ठेवलं गेलंय.

या अदला-बदलीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, देशातील सोन्याच्या उपलब्धतेत वाढ होईल आणि सोन्याच्या तस्करीवरही लगाम घालायला मदत होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.