रेव्ह पार्टीवर धडक, १६ तरुणींसह ८० जणांना अटक

उद्यपूरच्या गोवर्धन विलास पोलिसांनी सोमवारी कारवाई करत सामूहिक वेश्वावृत्ती आणि रेव्ह पार्टीत धुंद असलेल्या ८० जणांना अटक केलीय. यामध्ये, १६ तरुणींचाही समावेश आहे. 

Updated: Apr 7, 2015, 12:42 PM IST
रेव्ह पार्टीवर धडक, १६ तरुणींसह ८० जणांना अटक title=

उद्यपूर : उद्यपूरच्या गोवर्धन विलास पोलिसांनी सोमवारी कारवाई करत सामूहिक वेश्वावृत्ती आणि रेव्ह पार्टीत धुंद असलेल्या ८० जणांना अटक केलीय. यामध्ये, १६ तरुणींचाही समावेश आहे. 

पोलीस उपअधीक्षक रानू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उद्यपूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्थित उदय पॅलेस हॉटेल अॅन्ड रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सामूहिक वेश्वावृत्ती करताना तसंच रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या तब्बल ८० जणांना पोलिसांनी अटक केलीय. 

रिसॉर्टचे मालक पंकज बन्सल आणि त्यांची पत्नी निलिमा बन्सल यांनी या रेव्ह पार्टी आणि सामूहिक वेश्वावृत्तीसाठी पुढाकार घेतला होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पंकज घटनास्थळावरून पोबारा करण्यात यशस्वी झाला पण पोलिसांनी त्याची पत्नी निलिमा हिला अटक केलीय. निलिमा हिच्याकडून पोलिसांनी मोठी रोख रक्कमही हस्तगत केलीय.

या रेव्ह पार्टीसाठी मुलींना मुंबई, दिल्ली, भोपाळ, आग्रा, अहमदाबाद इथून दलालांमार्फत बोलावण्यात आलं होतं. रेव्ह पार्टीत आलेल्यांपैकी अनेक जण कपडे आणि मार्बल व्यावसायिक आहेत. अहमदाबाद, सूरत, किशनगड, डुंगरपूर आणि वलसाड इथले हे रहिवासी आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.