हत्या प्रकरणात बाबा रामदेवांच्या भावाला अटक

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली हर्बल फूड कंपनीच्या आवारात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरतला अटक झाली आहे. 

Updated: May 28, 2015, 06:36 PM IST
हत्या प्रकरणात बाबा रामदेवांच्या भावाला अटक  title=

हरिद्वार : योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली हर्बल फूड' कंपनीच्या आवारात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय. या प्रकरणी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरतला अटक करण्यात आलीय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आवारात अवैध हत्यारं हस्तगत करण्यात आली आहेत. ट्रक चालक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही हाणामारी झाली होती. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. 

या दगडफेकीनंतर रामभरत आणि त्याच्या जोडीदारांनी गोळीबार केल्याचं सांगण्यात येतंय. गोळीबारात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झालेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 

या घटनेनंतर लोकांनी रामभरतच्या अटकेची मागणी करत लष्कर राजमार्ग जाम केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रामभरतला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.