राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणात दोषी आरोपी मुरगन, सांथन, पेरारीवलन यांनी केंद्र सरकारची फाशी देण्याची याचिका फेटाळली आहे. केंद्रानं क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाचा विरोध करत याचिका केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय. 

Updated: Jul 29, 2015, 04:47 PM IST
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही- सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणात दोषी आरोपी मुरगन, सांथन, पेरारीवलन यांनी केंद्र सरकारची फाशी देण्याची याचिका फेटाळली आहे.केंद्रानं क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाचा विरोध करत याचिका केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय. 

७ दोषी आरोपींना सोडण्याचा होता निर्णय

यापूर्वी सुप्रीम कोर्टानं तिन्ही आरोपींची शिक्षा कमी करत फाशी ऐवजी त्यांना जन्मठेप दिली होती. सुप्रीम कोर्टाकडून राजीव गांधींच्या तीन मारेकऱ्यांची फाशी जन्मठेपेत बदलल्यानंतर तामिळनाडू सरकारनं राजीव गांधींचे सर्व सात मारेकरी मंथन, श्रीहरन उर्फ मुरुगुन, पेरारिवलन, नलिनी, राबर्ट पायस, रविचंद्रन आणि जयकुमराला सोडण्याची घोषणा केली होती. 

सुप्रीम कोर्टानं शिक्षा जन्मठेपेत बदलली होती

सुप्रीम कोर्टानं १८ फेब्रुवारी २०१४ला राजीव गांधी हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा मिळालेल्या मंथन, मुरुदन आणि पेरारिवलन तीन आरोपींची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. तिन्ही आरोपींनी दया याचिकेच्या तोडग्याबाबत उशीर झाल्याच्या आधारे फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टानं याचा विरोध करत असलेल्या केंद्र सरकारचे सर्व तर्क नाकारत याचिका फेटाळलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.