रेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू

रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Updated: Mar 14, 2015, 10:40 PM IST
रेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू title=

नवी दिली : रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या आमिषानं ५०० जणांची फसवणूक करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ४८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत 'झी मीडिया' वृत्त दाखविल्यानंतर याची तात्काळ दखल घेण्यात आली. राजकीय क्षेत्रातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे खासदार भांबरे यांनी याबाबत गंडा घालणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सीबीआय चौकशी झाली पाहिजे. यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रेल्वे मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं देशातल्या ५०० जणांच्या फसवणुकीचा खळबळजनक प्रकार उघड झालाय. रेल्वे मंत्रालयातील ई-मेल, पत्र आणि शिक्क्यांचा वापर करून बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या बोगस भरतीचे राज्यातलेही ४८ विद्यार्थी बळी ठरले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून तब्बल सात-सात लाख रुपये उकळण्यात आले आहेत. 

या विद्यार्थ्यांनी जमिनी विकून हे पैसे जमवले होते. त्यामुळं त्यांच्या आयुष्याच्या कमाईवरच डल्ला मारण्यात आलाय. सर्वात म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना रेल्वेच्याच कोलकाता आणि पाटण्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आलं. तसंच प्रशिक्षणात पगार पत्रकही अदा करण्यात आलं. या सर्व बोगस भरतीचा मुख्य सूत्रधार शिवाजी केरे असून तो संगमनेरचा रहिवासी आहे. दरम्यान याप्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिल्याची  माहिती भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी 'झी तास'शी बोलताना दिले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.