रेल्वेचा भरती महाघोटाळा, ५०० तरुणांना घातला गंडा

 रेल्वे मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं देशातल्या ५००  जणाना फसविल्याचे पुढे आले आहे. भरतीचा घोटाळा उघड झाल्याने अनेकांचे लागेबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Updated: Mar 13, 2015, 09:15 PM IST
रेल्वेचा भरती महाघोटाळा, ५०० तरुणांना घातला गंडा title=

नवी दिल्ली :  रेल्वे मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं देशातल्या ५००  जणाना फसविल्याचे पुढे आले आहे. भरतीचा घोटाळा उघड झाल्याने अनेकांचे लागेबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नोकरीच्या नावाने रेल्वेत फसवणुकीचा खळबळजनक प्रकार उघड झाल्याने एकच धक्का बसला आहे.  रेल्वे मंत्रालयातील ई-मेल, पत्र आणि शिक्क्यांचा वापर करून बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या बोगस भरतीचे राज्यातलेही ४८ विद्यार्थी बळी ठरले आहेत. 

या भरतीसाठी प्रत्येक उमेदवारांकडून ७ लाख रुपये उकळण्यात आलेत. हे पैसे देण्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनीही विकल्यात. उमेदवारांकडून पैसे उकळल्यानंतर रेल्वे विभागाकडून पत्रही पाठविण्यात आले. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात आले. तसेच पगार पत्रकही दिले गेले. तरीही या भरतीचा कोणाला संशय कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रेल्वेची यंत्र सामुग्री वापरताना ही बाब कोणाच्या लक्षात कशी आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी होते का, याच्यावर संशयाची भूमिका व्यक्त होत आहे.

बोगस भरतीसाठी काय काय केले?
- रेल्वे मंत्रालयातील ई मेल, पत्र, शिक्के यांचा वापर करून बोगस भरती प्रक्रीया  
- नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना फसवले
- प्रत्येकाकडून ७ लाख रूपये घेतले 
- महाराष्ट्रातील ४८ मुलांचा समावेश 
- रेल्वे विभागाकडून पत्र पाठवण्यात आले
- पत्र, ई मेल बोगस असल्याचे समजले 
- विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात आली होती
- पगार पत्रक दिले होते. 
- ओरिजनल स्टँम्पचा वापर करण्यात आला होता.
- विद्यार्थ्यांनी जमीन विकून पैसे दिले होते 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.