जोधपूर : जोधपूर-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा रविवारी सुदैवाने मोठा अपघात टळला. जयपूरहून जोधपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसचं इंजीन अचानक डब्यांपासून वेगळं झालं. तेव्हा एक्स्प्रेस 100 किलो मीटर प्रति तास वेगाने धावत होती.
जवळ-जवळ दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर ड्रायव्हरला हे लक्षात आलं, ही घटना सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी साळवा स्टेशनजवळ घडली. या घटनेनंतर घाबरलेले प्रवासी खाली उतरले.
यानंतर इंजीनला पुन्हा कोचवाल्या भागाशी जोडण्यात आलं, यानंतर 25 मिनिटांनी ट्रेन जोधपूरकडे रवाना झाली, सुत्रांच्या माहितीनुसार कपलिंग उघडल्याने इंजीन आणि कोच वेगवेगळे झाले.
ट्रेनला झटका लागल्यानंतर ट्रेन का थांबली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला तेव्हा इंजीनच नव्हतं. यानंतर परत येणारं इंजीन काही प्रवाशांनी पाहिलं आणि एकाच ट्रॅकवर दोन गाड्या समोरासमोर येत असल्याचं दिसल्याने आरडा-ओरड झाली आणि प्रवाशी खाली उतरले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.