अद्भूत,विचित्र : कुत्रीने दिला मांजरीच्या पिल्लांना जन्म?

 हरियाणातील सफीदोच्या गाव मुआनामध्ये एका कुत्रीने तीन मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची अद्भूत घटना घडली आहे. एका श्वानाने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची बातमी ऐकल्यावर राज्याच्या पशुपालन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. 

Updated: Jul 14, 2014, 04:08 PM IST
अद्भूत,विचित्र : कुत्रीने दिला मांजरीच्या पिल्लांना जन्म? title=

सफीदो (हरियाणा) :  हरियाणातील सफीदोच्या गाव मुआनामध्ये एका कुत्रीने तीन मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची अद्भूत घटना घडली आहे. एका श्वानाने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याची बातमी ऐकल्यावर राज्याच्या पशुपालन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. 

पिल्लांची डीएनए चाचणी केल्यानंतरच या बाबत काहीही सांगता येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. डीएनए चाचणीनंतर स्पष्ट होईल की हे पिल्ल कुत्र्याचे आहे की मांजरीचे. विशेष म्हणजे अशाप्रकारे यापूर्वी कोणतीही घटना ऐकीवात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

या गावातील नागरिकांनी सांगितले की, रामधारी जांगडा गावातील एका घरात ११ जुलैला एका कुत्रीने सर्वात प्रथम दोन मांजरांच्या पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर तीन कुत्र्यांच्या पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर १२ जुलै रोजी आणखी एका मांजराच्या पिल्लाला जन्म दिला. मांजराचे तिन्ही पिल्ले आपल्या आईचं म्हणजे कुत्रीचं दूध पीत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांची देखरेख करणाऱ्या गावातील युवकांनी त्या मांजरींच्या पिल्लांना बाटलीने दूध प्यायला दिले. 

एका कुत्रीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिल्याचे बातमी वाऱ्यासारखी पसरली, या पिल्लांना पाहण्यासाठी गावासह आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान पशु चिकित्साशी संबंधित तज्ज्ञांच्यामते अशा प्रकारे जन्म देणे अशक्य आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युवक या मांजरींच्या पिल्लांना दूर सोडून आले पण ती कुत्री त्यांना पुन्हा उचलून आपल्याजवळ आणत आहे. 

गावकऱ्यांनी याची माहिती पशुपालन विभागाच्या एसडीओ रवींद्र सिंह यांना दिली. त्यानंतर एसडीओंनी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पशु चिकित्सक डॉ. सुशील रोहिल्ला यांना गावात पाठविले आणि पिल्लांची तपासणी केले. या पिल्लांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.  

गावातील काही गावकऱ्यांच्या मते, कुत्रीसह गावात जवळपास एखाद्या मांजरीने पिल्लांना जन्म दिला असेल आणि ते रांगत त्या कुत्रीजवळ आले असतील. या संदर्भात सर्वजण आपआपले तर्क-वितर्क लावत आहेत. आता सर्व गोष्टींचा खुलासा डीएनएच्या टेस्टनंतर होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.