शिक्षा म्हणून मुलींना पाठवतात बॉइज हॉस्टेलमध्ये

स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असताना एका एनजीओमध्ये होत असलेला मुलींवरील अत्याचार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सोहोर येथील ब्राइट स्टार सोशल सोसायटी या एनजीओमध्ये मुलींना शिस्त लागावी म्हणून संतापजनक शिक्षा केली जाते. शिक्षा म्हणून अल्पवयीन मुलींना शेजारील मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाठवलं जातं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 10, 2013, 04:39 PM IST

स्त्रियांवरील अत्याचारांविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असताना एका एनजीओमध्ये होत असलेला मुलींवरील अत्याचार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सोहोर येथील ब्राइट स्टार सोशल सोसायटी या एनजीओमध्ये मुलींना शिस्त लागावी म्हणून संतापजनक शिक्षा केली जाते. शिक्षा म्हणून अल्पवयीन मुलींना शेजारील मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाठवलं जातं.
संगीता आणि इर्शाद जाफरी संचालित या एनजीओवर मंगळवारी धाड घातली असता हॉस्टेलमधील अल्पवयीन मुली भेदरलेल्या अवस्थेत आढळल्या. येथील मुलींकडून कुठलीही चूक झाली किंवा हॉस्टेलमधील गैरसोयींबद्दल तक्रार केली, तर त्याची शिक्षा म्हणून मुलींना शेजारी असलेल्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये पाठवले जाते. बॉइज हॉस्टेलमध्ये मुलींना अनेक वाईट आणि अपमानास्पद गोष्टी कराव्या लागत. या मुलींना तेथे मारहाणही होई, अशी माहिती हॉस्टेलमधील एका मुलीने दिली. बॉइज हॉस्टेलमध्ये नेमके काय घडायचे, हे विचारल्यावर कित्येक मुलींचा थरकाप उडत होता.

याशिवाय या हॉस्टेलमध्ये ४८ मुलींची नोंद असूनही केवळ ३०च मुली हजर असल्याचं निदर्शनास आलं. याबद्दल एनजीओच्या सचिवांनी उत्तर दिलं, की दिवाळीच्या सुट्टीत घरी गेलेल्या मुली परत आल्याच नाहीत. या प्रकरणानंतर सदर एनजीओचा परवाना रद्द करून हॉस्टेल तीन दिवसांत बंद करण्याचे आदेश दिले गेले. मात्र हॉस्टेलचालकांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.