'पृथ्वी -२' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

अण्वस्त्रधारी 'पृथ्वी 2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 16, 2016, 05:13 PM IST
'पृथ्वी -२' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी title=

बालासोर : अण्वस्त्रधारी 'पृथ्वी 2' या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. चंडीपूरस्थित इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) येथून ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. 

आज सकाळी दहा वाजता मोबाईल लॉंचरच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली. 

या क्षेपणास्त्राचा पल्ला 350 किलोमीटर असून या क्षेपणास्त्रात 500 ते 1000 किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.  'पृथ्वी-2' हे क्षेपणास्त्र 2003 मध्ये लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले आहे.'डीआरडीओ' तर्फे बनविण्यात आलेले भारतीय बनावटीचे हे पहिले क्षेपणास्त्र आहे. यापूर्वी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.