मोदींच्या निर्णयाने राष्ट्रपतींना 'वीर भूमी'वर जाण्यापासून रोखलं!

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची गुरुवारी म्हणजेच २१ मे पुण्यतिथी होती. या निमित्तानं राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी 'वीर भूमी'वर अनेक मान्यवर जमले होते... मात्र, गेल्या वर्षीपर्यंत या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मात्र यंदा इथं उपस्थित नव्हते. 

Updated: May 22, 2015, 03:53 PM IST
मोदींच्या निर्णयाने राष्ट्रपतींना 'वीर भूमी'वर जाण्यापासून रोखलं! title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची गुरुवारी म्हणजेच २१ मे पुण्यतिथी होती. या निमित्तानं राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी 'वीर भूमी'वर अनेक मान्यवर जमले होते... मात्र, गेल्या वर्षीपर्यंत या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मात्र यंदा इथं उपस्थित नव्हते. 

या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी हजर राहू शकले नाहीत. त्याला मोदी सरकारचा एक निर्णय कारणीभूत ठरलाय. मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमातून सरकारला वेगळं केलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्याचं स्मारक 'वीर भूमी' येथे जाण्यास उत्सुक होते... त्यांना तसं आमंत्रणही मिळालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते 'वीर भूमी'वर जात आहेत, मात्र गुरूवारी तसं झालं नाही. 

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ड वाड्रा यांनी गुरूवारी सकाळी 'वीर भूमी'वर राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ मध्ये प्रचारादरम्यान तामिळनाडूच्या श्रीपेरम्बदूरमध्ये हत्या करण्यात आली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.