सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटचा ४ कोटी ३१ लाखांना लिलाव करण्यात आलाय.
सुरतमध्ये सुरू असलेल्या लिलावात मोदींच्या १० लाखांच्या सुटसाठी गेल्या तीन दिवसांपासून लिलाव सुरू होता.
पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी ११ लाखांपासून या सुटसाठी बोली लावण्यात आली. मात्र या सुटसाठी एवढी स्पर्धा वाढली की कालपासून कोटींची बोली सुरू झाली.
अखेर लालजी पटेल या हिरा व्यापाऱ्यानं चार कोटी ३१ लाखांना हा सुट विकत घेतला.
आश्चर्य म्हणजे, लिलावाची वेळ संपल्यानंतरही काही व्यापाऱ्यांनी या सुटसाठी पाच कोटींपेक्षा जास्त बोली लावली. मात्र लिलावाची मुदत संपल्यानं त्यांना हा सुट घेता आला नाही.
या सुटसह मोदींच्या इतरही ४५५ वस्तूंचाही लिलाव करण्यात आला. या लिलावातून मिळालेल्या निधीचा स्वच्छ गंगा मोहिमेसाठी वापर करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.