नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटर आणि भाजप नेता नवज्योत सिंग सिद्धू यांना लवकर बरे होण्याची कामना केली आहे. सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या ट्विटवर उत्तर देताना मोदी यांनी उत्तर लिहिले की तुम्ही एक योद्धा आहात आणि आपल्या ट्रेड़ मार्क स्टाइलमध्ये आजारावर विजय मिळवाल, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
सिद्धू यांना मंगळवारी अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. न्यूरोलॉजिकल समस्या असल्याने सिद्धू यांना अपोलो हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते.
Dear @sherryontopp ji, get well soon. You are a fighter & will overcome the illness in your trademark style. Our prayers are with you.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2015
सिद्धू यांच्या धमण्यांमध्ये एक गाठ असल्यामुळे त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले.
काही न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या स्थितील डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणतात. योग्य वेळी त्यावर उपचार झाला नाही तर त्यांच्या जिविताला धोका उद्भवू शकतो. रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये डीव्हीटी अडथळा निर्माण करू शकते, असे हॉस्पिटलने सांगितले.
प्राथमिक उपचारानंतर सिद्धू यांच्या प्रकृती स्थिर आहे. सिद्धू यांना ब्लड थिनर्सवर ठेवण्यात आले आहे. ते लवकरच बरे होती, असे हॉस्पिटलने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.